प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आपल्या प्रिय दुर्गामातेचा जागर करत आहोत. आपल्या सर्वांची श्रद्धा आणि लाख मोलाच्या सहकार्यामुळेच मंडळ ५० व्या वर्षात  दिमाखात  नवरात्रौत्सव साजरा करण्यास सज्ज झाले. ह्या सोहळ्याची परंपरा चालू ठेवताना भारतीय संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा मंडळाचा निर्धार आहे.

ह्या मनोगताद्वारे आमच्या समाजाशी निगडीत अशी अत्यंत महत्वाची गोष्ट तसेच पारदर्शक सत्य सांगण्याचा मानस आहे, निमित्त आपल्या विभागातील दुर्गामातेच्या  नवरात्रौत्सवाचे ! दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्सव ! लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरूष, तुम्ही-आम्ही एकत्र येऊन साजरा करावयाचा आनंदोस्तव ! आपल्या आनंदात तिर्‍हाईत अनोळखी माणसालाही सामावून घेण्याचा, ऐकतेचा आणि समतेचा मंत्र देणारा एक हवा हवासा वाटणारा महोत्सव !

उस्तव साजरा करतेवेळी मंडळाची स्थापना करणारे, त्यांचे तत्कालीन सहकारी आणि आपल्यामध्ये हयात असणार्‍या, नसणार्‍या सर्व व्यक्तिंचे व दिवंगत कार्यकर्त्यांचे स्मरण होत आहे. त्यांचे कार्य आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल.

तसेच असंख्य हितचिंतक, देणगीदार, वर्गणीदार व जाहिरातदारांचे मनःपुर्वक आभार ! आदिशक्ती दुर्गामातेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहो आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय व सु़खमय होवो, हीच श्री दुर्गामातेचरणी प्रार्थना...!